डिजीटल शैक्षणिक धोरण कसे असावे
माझे मत.. 👉
मित्रांनो 🙏
मी शफी सर, ढाणकी, यवतमाळ
मला आपल्याला सांगताना अत्यंत आनंद व अभिमान वाटतो, आमच्या यवतमाळ जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी 🔸मा. डॉ. सुचिता पाटेकर मॅडम🔸 यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन मी "डिजीटल, ई लर्निंग" याबाबतीत विचार करायला सुरुवात केली, आदरणीय मॅडम च्या नेतृत्वाने आम्हाला मंच दिले, तंत्रस्नेही शिक्षकांची सभा घेतली, त्यातून 🔺मा. नंदकुमार साहेब 🔺 प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र शासन यांना ऐकावयाची, त्यांच्याशी प्रसन्न व खुल्या विचारांनी चर्चा करण्याची संधी मिळाली.
त्यातुन जन्म झाला, "तंत्रस्नेही उपक्रमशिल शिक्षकांच्या गटाचा" , आणि दि. १८ एप्रील २०१५, मा. प्रधान सचिव साहेबांच्या अध्यक्षतेखाली SCERT पुणे येथे "उपक्रमशिल तंत्रस्नेही शिक्षकांची सहविचार सभा" आयोजित करण्यात आली. अत्यंत आनंदाची बाब ही की, त्या सभेसाठी उपस्थित राहण्या बाबतचा आदेश Email द्वारे मा. संचालक SCERT यांचेकडून * मला प्राप्त झाला.
त्या अनुषंगाने आपले मत व्यक्त करण्यासाठी मी माझ्या कल्पनेतून "महाराष्ट्र राज्य डिजीटल शैक्षणिक धोरण कसे असावे" याबद्दल आपले मत बनविले ते पुढीलप्रमाणे व संधी मिळाल्यास मी हे SCERT मध्ये ही मांडणार.
हे धोरण ५ स्तरावर विभाजित करण्यात यावे
१.विद्यार्थी विकास
२ प्रशिक्षण
३.ई शाळा व्यवस्थापन
४.ई लर्निंग साहित्य निर्मिती व प्रसार
५.ई सुविधा
🔴१. विद्यार्थी विकास
🔹संपूर्ण धोरण हे विद्यार्थी केंद्रित असावे
🔹संपूर्ण विद्यार्थी शाळा पातळीवर संगणक साक्षर व्हायलाच हवे
🔹ई-लर्निंग साहित्य जसे. स्मार्टफोन, संगणक, टॅब, प्रोजेक्टर, इंटरअॅक्टिव्ह स्मार्टबोर्ड, इंटरनेट, एन्ड्राईड ऑफलाइन अॅप्स, सोलर energy या सर्व आधुनिक संसाधनांचा वापर अध्ययन अध्यापन प्रक्रियेत व्हावा.
🔹सदर प्रक्रियेत कृती युक्त अध्ययन अध्यापन, मूलगामी शिक्षण पद्धति व ई लर्निंग यांचा त्रिवेणी संगम व्हावा
🔹तंत्रज्ञानाचा वापर त्याला घरी ही करता यावा या अनुषंगाने विविध ई बुक्स, ई स्वाध्यायिका, शैक्षणिक अॅप्स विकसित व्हाव्यात
🔹सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे सुध्दा ई साहित्य वापर करुन व्हावे तसेच त्या संबधित अभिलेखे ही सुध्दा ई फार्मेट मध्ये जतन करावी
🔴२. प्रशिक्षण
🔹तालुका स्तरावर एका ICT "माहीती तंत्रज्ञान व प्रसार" गटाची निर्मिती उपलब्ध साधन व्यक्तितून करावी
🔹तंत्रस्नेही शिक्षकांची जिल्हा निहाय फळी बनवून, त्यांना SCERT पातळीवर ई लर्निंग प्रशिक्षण देण्यात यावे
🔹प्रशिक्षित तंत्रस्नेही शिक्षकांकरवी उर्वरीत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात यावे, इथे किमान अपेक्षा ई लर्निंग चा अध्यापनात वापर ही असावी
🔹मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तथा अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार ई प्रशासन विषयी प्रशिक्षण देण्यात यावे
🔹जिल्हा पातळीवर एक ICT Help Center व राज्य पातळीवर एक toll free ICT help line असावी.
🔴३. ई कार्यालय व्यवस्थापन
🔹प्रत्येक कार्यालय शाळा ऑफीस ते वरिष्ठ अधिकारी, प्रशासनाकरीता लागणारे सॉफ्टवेयर विकसित करण्यात यावे
🔹तंत्रस्नेही शिक्षक, अधिकारी व संघटन यांची मदत घेवून सॉफ्टवेयर विकसित केल्यास खर्च पण वाचविता येईल
🔹शाळा स्तरावरील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तथा सर्व अधिकारी यांनी परस्परांत पत्र व्यवहार करतांना ई मेल वापराचा आग्रह असावा
🔹शालेय अभिलेख व दस्तावेज यांना जतन करण्यासाठी सॉफ्टवेयर ची निर्मिती व्हावी.
🔹प्रत्येक शाळेची स्वतंत्र वेबसाइट असावी, त्यावरील माहीती निदान त्रैमासिक कालावधीत update करण्यात यावी.
🔹बायोमेट्रीक पद्धतीचा अवलंब व्हावा, पुरविण्यात आलेल्या सुविधा व साहित्य याचा वापर होतो की नाही हे पडताळून निरीक्षण व्हावे
🔴४. ई लर्निंग साहित्य निर्मिती व प्रसार
🔹तंत्रस्नेही शिक्षक, अधिकारी तसेच शिक्षण प्रेमी व्यक्ति यांच्या मदतीने ई लर्निंग साहित्य निर्मिती करण्यात यावी
🔹ई लर्निंग साहित्यात जास्तीत जास्त साहित्य हे ऑफलाइन सपोर्ट करणारे असावे उदा. विविध अॅप्स, ई बुक्स, ई स्वाध्यायिका, ppt, video, audio etc.
🔹प्रत्येक जिल्हयात या साहित्याची प्रदर्शनी भरवावी व साहित्य प्रसार, वितरन करण्यात यावे.
🔴५. ई सुविधा
🔹प्रती शाळा स्तर किमान एक संगणक, केंद्रस्तरावर प्रोजेक्टर पुरविण्यात यावे
🔹प्रत्येक शाळेत इंटरनेट साठी ब्रॉडबैंड कनेक्शन किंवा
केंद्रस्तरावर एका WiFi route or Mini tower ची निर्मिती करण्यात यावी ज्याद्वारे केंद्रातील इतर शाळांना WiFi code देवून इंटरनेट सुविधा पुरविण्यात यावी.
🔹प्रती शाळा किमान संगणक चालेल या क्षमतेचे solar panels पुरविण्यात यावे.
अशाप्रकारे मांडलेल्या या विचारात अजूनही काही कमी अधिक करावे असे अपेक्षित असल्यास आपण मला कळवावे वा संदेश पाठवावा ही नम्र विनंती.
आपला मित्र
✏शफी सर, ढाणकी 7507127012 shafisk.wordpess.com